Belagavi

माळमारुतीचे सीपीआय बी. आर. गड्डेकर यांना राष्ट्रपती पदक

Share

बेळगाव येथील माळमारुती पोलीस ठाण्याचे वर्तुळ निरीक्षक बी. आर. गड्डेकरांना स्वातंत्र्यदिनानिमित्त जाहीर होणारे राष्ट्रपती उत्कृष्ट सेवा पदक देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी केलेल्या उल्लेखनीय आणि प्रामाणिक सेवेबद्दल हा बहुमान त्यांना मिळाला असून, यामुळे पोलीस दलाची मान उंचावली आहे.

वर्ष २००५ मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झालेल्या बी. आर. गड्डेकरांनी गुन्हे नियंत्रण आणि सायबर गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोलाचे योगदान दिले आहे. सीसीबी आणि सीइएन विभागात कार्यरत असताना इराणी टोळीचा पर्दाफाश करणे, सायबर फसवणुकीतील लाखो रुपये नागरिकांना परत मिळवून देणे आणि आंतरराष्ट्रीय फसव्या कॉल सेंटरवर छापे टाकणे अशा धडक कारवाया त्यांनी केल्या आहेत. यापूर्वीही अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या गड्डेकरांच्या या यशाबद्दल बेळगाव पोलीस वर्तुळातून अभिनंदन केले जात आहे.

Tags: