Belagavi

इस्कॉनतर्फे टिळकवाडीत जन्माष्टमी मंडपाचे मुहूर्तमेढ पूजन

Share

बेळगावमध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवाची तयारी वेगाने सुरू असून इस्कॉनच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर टिळकवाडी येथील मंदिराच्या समोर उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडपाच्या मुहूर्तमेढ पूजनाचा सोहळा पार पडला.

इस्कॉनच्या वतीने येत्या ४ आणि ५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सवानिमित्त टिळकवाडी येथील श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरासमोर उभारल्या जाणाऱ्या मंडपाचे पूजन इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष पूज्य भक्तिरसामृत स्वामी महाराज यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी भजन, कीर्तन आणि महामंगल आरती पार पडली. या सोहळ्याला संकर्षण दास, राम प्रभु, नागेंद्र प्रभु, मदन गोविंद दास यांच्यासह अनेक मान्यवर व भाविक उपस्थित होते. उत्सवाच्या नियोजनासाठी विविध समित्या स्थापन करण्यात आल्या असून कार्यकर्ते तयारीत व्यस्त आहेत.

Tags: