Belagavi

भेंडीगेरी येथे जादा गाड्यांच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे रस्ता रोको आंदोलन

Share

बेळगाव जिल्ह्यातील भेंडीगेरी गावात पुरेशी बस सेवा उपलब्ध नसल्याने त्रस्त झालेल्या विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी रस्ता रोको करत आंदोलन केले.

भेंडीगेरी गावात बस सेवा अपुरी पडत असल्याने विद्यार्थी आणि नागरिकांचे रोज हाल होत आहेत. एकाच बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करत असल्याने वेळेवर शाळा-कॉलेज गाठणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सकाळी ८:३० व ९:३० तसेच संध्याकाळी ४:३० व ५:३० वाजता जादा बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. यासंदर्भातील निवेदन केएसआरटीसी बेळगाव विभाग नियंत्रकांना पाठवण्यात आले आहे.

तसेच पारिश्वाड-बेळगाव मार्गावर धावणाऱ्या सर्व सरकारी बसना भेंडीगेरी गावात अनिवार्य थांबा देण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी खेळ न करता मागण्या तातडीने मान्य न केल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

Tags: