येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव शहरात घरगुती गणेशमूर्तींचे आगमन झाले असून बुकिंगला सुरुवात झाली आहे. शहरातील विविध केंद्रांवर भाविक आपल्या पसंतीनुसार मूर्ती निवडताना दिसत आहेत.


वाहतूक खर्च आणि नुकत्याच झालेल्या पावसामुळे मूर्तींच्या किमतीत काही प्रमाणात वाढ झाली असली, तरी भाविकांचा उत्साह कायम आहे. चिंतामणी, लालबागचा राजा, स्वामी समर्थ रूप, अँटीक आणि खडकडे गल्ली पॅटर्नच्या दीड ते तीन फूट उंचीच्या १५० हून अधिक मूर्ती उपलब्ध आहेत. गणाचारी गल्लीतील ‘चिंतामणी आर्ट्स’ येथे बुकिंग प्रक्रिया वेगाने सुरू आहे. व्यावसायिक हरिश गवळी यांनी महाराष्ट्रातील पेण येथून या विशेष मूर्ती मागवल्या आहेत. स्थानिक नगरसेवक शंकर पाटील आणि समर्थकांच्या सहकार्याने या मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या असून, नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन हरिश गवळी यांनी केले.


सूरज या भाविकाने सांगितले की, केदारनाथ आणि कटीलु प्रवास आटोपून आल्यानंतर त्यांनी स्वामी समर्थ रूपातील मूर्तीची बुकिंग केली आहे. पावसामुळे काही अडचणी येत असल्या तरी बाप्पाच्या आशीर्वादाने सर्व कामे सुरळीत पार पडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.



Recent Comments