Belagavi

लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपद देण्याच्या मागणीसाठी मशाल मोर्चा

Share

माजी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांना राज्य मंत्रिमंडळात स्थान देण्यात यावे या मागणीसाठी बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी येथे समर्थकांनी मशाल मोर्चा काढला.

बाळविकास अकादमीचे अध्यक्ष अडिवेश इटगी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन झाले. गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या मोर्चात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोर्च्यानंतर कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्गावर काही काळ रस्ता रोको केला. यामुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. पोलिसांनी मध्यस्थी करत रस्ता रोको मागे घेण्यास कार्यकर्त्यांना भाग पाडले.

लक्ष्मी हेब्बाळकर यांनी पक्षसंघटना आणि जनसेवेसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचा अनुभव व प्रशासकीय क्षमता लक्षात घेऊन मंत्रिमंडळात स्थान द्यावे, असे अडिवेश इटगी यांनी सांगितले.

उत्तर कर्नाटकातील जनतेच्या भावनांचा आदर करत वरिष्ठ नेतृत्वाने हेब्बाळकर यांना मंत्रीपद द्यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली. हिरेबागेवाडी बसवेश्वर चौकातून राष्ट्रीय महामार्गापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.

आंदोलनात सिद्धप्पा शिंगाडी, रघू पाटील, मन्सूर अली अत्तार, अनिल करलिंगणावर, सिद्धप्पा चापगांवी, अडिवप्पा तोटगी, रवी गाणगी, मुश्याप्पा उप्पार, राजू उप्पार, नीलकंठ, आंजनेय, गौस जालिकोप, रवी गणिका, रमेश वाली, रशीद साहेद, बसवराज इटगी, आनंद पाटील, सुरेश गोंडलूर, चन्नप्पा हुदली, नीलकंठ परवती, बसवराज यादवाड, महेश गुंडलूर यांच्यासह अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: