Belagavi

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा: बेळगावच्या डायनामिक शोटोकान संस्थेला अग्रस्थान!

Share

कोप्पळ येथील गंगावती येथे पार पडलेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे कप स्पर्धेत बेळगावच्या कराटेपटूंनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. एकूण ७४ पदके पटकावून ‘डायनामिक शोटोकान कराटे-डो’ संस्था प्रथम क्रमांकाची विजेती ठरली आहे.

ड्रीम वर्ल्ड मार्शल आर्ट्स ट्रस्टतर्फे २६ जुलै रोजी गंगावती येथे आयोजित २ऱ्या आंतरराष्ट्रीय कराटे कप स्पर्धेत विविध देशांतील १५०० हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला होता. या मुख्य स्पर्धेत बेळगावच्या डायनामिक शोटोकान कराटे-डो (DSKI) संस्थेच्या ५४ खेळाडूंनी सहभाग घेऊन कटा आणि कुमिते प्रकारात २६ सुवर्ण, २० रौप्य आणि २८ कांस्यपदके जिंकून विजयाची पताका फडकावली.

या विजेत्या कराटेपटूंचा कंग्राळी खुर्द येथे भव्य सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. DSKI अध्यक्ष मल्लेश चौगुले, मुख्य प्रशिक्षक सिहान नागेश पाटील, सेन्साई मितेश नीलजकर, सेन्साई गायत्री सामजी, सेन्साई विघ्नेश बाळेकुंद्री आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली या खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय स्तरावर बेळगावचे नाव उज्ज्वल केले आहे.

Tags: