बेळगाव हा मोठा जिल्हा असून जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची अपेक्षा आहे, असा विश्वास उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ सेठ यांनी व्यक्त केला आहे. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मतदारसंघात उत्तम काम केले असून, जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद देण्यात यावे अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आज बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना उत्तर मतदारसंघाचे आमदार असिफ सेठ म्हणाले की, बेळगाव हा मोठा जिल्हा असल्याने जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी चांगले काम केले असून त्यांना मंत्रिपद देण्याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान ३४ मंत्रिपदांची मर्यादा असून, राज्यातील सर्व जिल्हे आणि जातीय समीकरणे सांभाळणे हे सरकारसमोरील आव्हानात्मक काम आहे. तरीही येत्या काळात आम्हाला मंत्रिपद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मंत्रिपद कोणालाही द्या, पण आमच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी आवश्यक निधी द्या, अशी विनंती मी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे, असे त्यांनी सांगितले. तसेच पक्षातील काही नेत्यांमध्ये असलेल्या नाराजीवर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, सुरुवातीला एक-दोन दिवस निराशा होणे स्वाभाविक आहे, परंतु नंतर सर्व काही पूर्ववत होईल. पक्ष आणि सरकारने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाशी आपण कटिबद्ध राहू, असे त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक किंवा निर्णयानंतर कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये सुरुवातीला थोडी नाराजी निर्माण होणे स्वाभाविक आहे, पण दोन दिवसांत सर्व काही ठीक होईल, असे त्यांनी नमूद केले. महामंडळ किंवा पदांच्या वाटपाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी अत्यंत मुत्सद्दी प्रतिक्रिया दिली, “पक्ष आणि सरकारने कोणतीही जबाबदारी दिली तरी ठीक, नाही दिली तरी ठीक, आम्ही ती स्वीकारण्यास तयार आहोत,” असे म्हणत त्यांनी पक्षाच्या निर्णयाशी एकनिष्ठ असल्याचे स्पष्ट केले.


Recent Comments