Belagavi

सरला हेरेकर यांचा नागरी सत्कार आणि ‘गुुरुवंदना’ कार्यक्रम

Share

बेळगाव येथील श्री बसवेश्वर कोऑपरेटिव्ह बँकेच्या नूतन अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सरला शिवानंद हेरेकर यांचा सत्कार सोहळा पार पडला.

क्लब रोड शाखेत आयोजित या कार्यक्रमात कागवाड येथील ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांनी उपस्थित राहून सरला हेरेकर यांचा सत्कार केला.

या प्रसंगी सरला हेरेकर यांनी आपल्या मार्गदर्शक गुरूंना श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन ‘गुुरुवंदना’ करत त्यांचा आदरपूर्वक सन्मान केला.

गुरू आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने बँकेत पारदर्शक कारभार व उत्कृष्ट ग्राहक सेवा देणार असल्याचे प्रतिपादन सरला हेरेकर यांनी केले.

Tags: