बेळगावातील नेहरू नगर येथील डी-मार्ट जवळ शाळेत जाणाऱ्या शिक्षिकेचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. ‘काम्स’ (KAAMS) ॲपवर वेळेत हजेरी नोंदवण्याच्या गडबडीत हा अपघात घडला आहे.

टिळकवाडी येथील सरकारी शाळा क्रमांक ९ मधील शिक्षिका राजश्री नारायण वराळे या नेहमीप्रमाणे शाळेत जात होत्या. शासनाच्या नव्या ‘काम्स’ ॲपवर वेळेत हजेरी नोंदवण्याच्या ताणाखाली त्या वेगाने शाळेकडे जात होत्या.

रस्त्यावरील खड्डा चुकवण्याच्या प्रयत्नात असताना मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने त्यांना धडक दिली. या अपघातात शिक्षिका राजश्री वराळे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
धडक दिल्यानंतर वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेमुळे शिक्षक वर्गात संताप व्यक्त केला जात असून, ॲपवरील वेळेच्या कडक नियमांमुळे प्रवासादरम्यान जीवाला धोका निर्माण होत असल्याची भावना शिक्षकांनी व्यक्त केली आहे.
शिक्षणाधिकाऱ्यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन शिक्षकांवरील मानसिक आणि वेळेचा ताण कमी करावा, अशी मागणी शिक्षक संघटनेकडून करण्यात येत आहे.


Recent Comments