Belagavi

हिरेबागेवाडीत जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड

Share

बेळगाव जिल्ह्यातील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांनी बेकायदेशीर जुगाराविरुद्ध धडक कारवाई केली आहे. शगणीमट्टी लीफ फार्मजवळ पैशांची पैज लावून अंदर-बाहर जुगार खेळणाऱ्या अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी १० आरोपींना ताब्यात घेतले असून १ लाखांहून अधिक रक्कम जप्त केली आहे.

हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदेश्वर कुंभार आणि पोलीस उपनिरीक्षक अविनाश वाय यांच्या नेतृत्वाखालील पथकाने २६ जुलै रोजी ही कारवाई केली. शगणीमट्टी लीफ फार्मजवळ सार्वजनिक ठिकाणी जुगार खेळणाऱ्या ठिकाणावर अचानक धाड टाकून चेतन, संतोष, रमजान, इस्माईल यांच्यासह एकूण १० जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून १,२२,०१६ रुपये रोख, पत्त्यांचे कॅट आणि प्लास्टिकचे ताट जप्त करण्यात आले आहे.

धाडीदरम्यान सचिन शिंदे नावाचा आणखी एक आरोपी पसार झाला असून, याप्रकरणी हिरेबागेवाडी पोलीस ठाण्यात कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Tags: