बेळगाव तालुक्यातील काकती गावातील सरकारी प्राथमिक व हायस्कूलमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मंजूर झालेल्या नवीन शाळा खोल्यांच्या बांधकामाचे भूमीपूजन पार पडले. मंत्री सतीश जारकीहोळी यांच्या विशेष निधीतून हे काम होत आहे.


सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ३६ लाख रुपये निधीतून मंजूर झालेल्या २ शाळा खोल्यांच्या बांधकामाचे भूमीपूजन पंचायत समिती सदस्य यल्लाप्पा कोळेकर यांच्या हस्ते शुक्रवारी पार पडले. या वेळी मुलांच्या शैक्षणिक हितासाठी कामाच्या गुणवत्तेशी कोणतीही तडजोड न करता दर्जा उत्तम राखण्याचा सल्ला त्यांनी कंत्राटदाराला दिला.

ग्रामपंचायत अध्यक्षा वर्षा मुचंडीकर बोलताना म्हणाल्या, की मंत्र्यांच्या योगदानामुळे गावात शैक्षणिक सुधारणा होत आहे. तसेच विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेऊन तात्काळ खोल्या मंजूर केल्याबद्दल एसडीएमसी अध्यक्ष कृष्णा कुरुबर यांनी मंत्र्यांचे आभार मानले.
या वेळी चन्नम्मा विजयोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. एस. डी. पाटील यांनी सीमाभागातील शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाला बसवराज गाणीगेर, रेणुका कोळी, जमुना कोळी, एस. ए. अंकलगी, कंत्राटदार एस. एम. पाटील, भरमा बुडके, दिनेश शेंडगे, बांधकाम विभागाचे पवन गस्ती, अशोक खोत, गिरीश जगजंपी, शिवानंद तल्लूर यांच्यासह ग्रामस्थ, एसडीएमसीचे सदस्य आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.


Recent Comments