mumbai

मुंबईमध्ये वाढत्या महागाईविरोधात काँग्रेसचे आंदोलन

Share

देशात सातत्याने वाढणारी महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला होता. केंद्र सरकारच्या लोकविरोधी धोरणांचा निषेध करण्यासाठी कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते.

देशात दिवसेंदिवस वाढणाऱ्या महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात मुंबई काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारविरोधात संताप व्यक्त करत निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. मुंबई काँग्रेस अध्यक्षा व खासदार वर्षा गायकवाड आणि जिल्हाध्यक्ष अर्शद अझमी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या धोरणांमुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले असून, देशातील गंभीर समस्यांवरून सरकारला धारेवर धरण्यासाठी काँग्रेसचे पदाधिकारी, प्रमुख नेते आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.

राहुल गांधी यांच्या विचारसरणीने प्रेरित होऊन झालेल्या या आंदोलनात काँग्रेस नेत्या ॲडव्होकेट गौरी छाब्रिया यांनी सहभाग घेतला होता. सततच्या महागाईमुळे गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबे अडचणीत सापडली असून त्यांचे जगणे असह्य झाले आहे. जोपर्यंत प्रत्येक सामान्य नागरिकाला न्याय मिळत नाही आणि महागाईवर नियंत्रण येत नाही, तोपर्यंत आमचा हा लढा अविरतपणे सुरूच राहील, अशी प्रतिक्रिया गौरी छाब्रिया यांनी व्यक्त केली.

या आंदोलनात काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: