fire

शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग: फर्निचर दुकान जळून खाक

Share

मूडलगी तालुक्यातील संगनकेरी गावातील एका फर्निचरच्या दुकानाला पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत दुकानातील कोट्यवधी रुपयांचे फर्निचर जळून खाक झाले असून मोठे नुकसान झाले आहे.

पहाटे तीन वाजेच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा संशय व्यक्त होत आहे. शिवलिंग पाटील यांच्या मालकीचे एसएमके फर्निचर दुकान या आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. दुकानातील महागडे फर्निचर, साहित्य आणि यंत्रसामग्री काही वेळातच पूर्णपणे जळून कोळसा झाली.

दुकानाच्या अगदी शेजारीच पेट्रोल पंप असल्याने परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. काही तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले. ही घटना घटप्रभा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: