Khanapur

खानापूरमध्ये साई स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उन्हाळी प्रशिक्षण शिबीर

Share

खानापूर तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडूंना विविध खेळांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी साई स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उन्हाळी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

खानापूर येथील मराठा मंडळाच्या सिद्धिविनायक स्कूलमधील सुसज्ज मैदानावर हे प्रशिक्षण शिबिर पार पडणार आहे. या शिबिराच्या माध्यमातून स्केटिंग, क्रिकेट आणि फुटबॉल या खेळांतील कौशल्ये विकसित करण्याची संधी खेळाडूंना मिळणार आहे. नुकतेच प्रसाद जाधव आणि राजलक्ष्मी जाधव यांच्या हस्ते या मैदानाचे पूजन करण्यात आले. हे शिबिर अनुभवी प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, जास्तीत जास्त खेळाडूंनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन अकॅडमीने केले आहे.

यावेळी स्केटिंग प्रशिक्षक सूर्यकांत हिंडलगेकर, योगेश कुलकर्णी, ऋषिकेश पसारे यांच्यासह अकॅडमीचे कर्मचारी, खेळाडू आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुक्यातील खेळाडूंना खेळाच्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

Tags: