बेळगावमधील नागरिकांना आज पौराणिक महत्त्व असलेल्या सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेण्याची पर्वणी लाभली. आर्ट ऑफ लिविंगच्या सहकार्याने हे ज्योतिर्लिंग शहरात आणण्यात आले असून, दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री कपिलेश्वर मंदिरात भाविकांसाठी दर्शनाची सोय करण्यात आली होती.


हे मूळ सोमनाथ ज्योतिर्लिंग असून याची स्थापना चंद्राने केली होती, असे मानले जाते. भगवान श्रीकृष्ण देखील याच ज्योतिर्लिंगासमोर ध्यानाला बसले होते. सुमारे हजार वर्षांपूर्वी मोहम्मद गझनीने स्वारी केली असता हे ज्योतिर्लिंग उद्ध्वस्त केले होते. या पार्श्वभूमीवर तेथील पुजाऱ्यांनी ज्योतिर्लिंगाचे अवशेष तामिळनाडूमध्ये नेले आणि त्याला पुन्हा शिवलिंगाचा आकार देऊन सुमारे हजार वर्षे गुप्तपणे पूजा केली.

पुढील काळात कांचीच्या शंकराचार्यांच्या मार्गदर्शनानुसार, दक्षिण भारतात राममंदिराची उभारणी झाली तेव्हा हे ज्योतिर्लिंग श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. आज हे सोमनाथ ज्योतिर्लिंग बेळगावमधील नागरिकांच्या कल्याणासाठी शहरात आले असून, मोठ्या संख्येने भाविकांनी याचा लाभ घेतला. तरुण पिढीने कुटुंब आणि समाजासोबत आर्थिक तसेच आध्यात्मिक प्रगती साधत जीवन जगावे, असे आवाहन स्वामी शरणू यांनी केले आहे.

याप्रसंगी आर्ट ऑफ लिविंगचे हर्षद पत्रावळी यांच्यासह श्री कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट कमिटीचे सदस्य उपस्थित होते.



Recent Comments