State

मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय हायकमांडच्या हाती : गृहमंत्री

Share

राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना वेग आला असताना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याबाबत हायकमांड जो काही निर्णय घेईल, तो सर्वांना बंधनकारक असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

आमदारांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना जी. परमेश्वर यांनी आपली भूमिका मांडली. मंत्रीपद सांभाळण्यास सक्षम असलेल्या वरिष्ठ नेत्यांनी पदाची मागणी करणे चुकीचे नाही. मात्र, यावर मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि हायकमांडनेच अंतिम निर्णय घ्यायचा आहे, असे जी. परमेश्वर यांनी म्हटले.

मंत्रिमंडळात काही वरिष्ठ मंत्र्यांऐवजी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची पद्धत आहे. ज्येष्ठांकडून नवीन पिढीला अनुभव मिळाल्यानंतर असे बदल केले जातात. कोणी काहीही विधाने केली तरी त्याचा फारसा परिणाम होणार नाही, कारण अंतिम निर्णय हायकमांडचाच असेल, असे जी. परमेश्वर यांनी सांगितले. हायकमांडने आदेश दिल्यास नव्या लोकांसाठी जागा करून देणे आवश्यक आहे आणि यावर प्रश्न उपस्थित करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया जी. परमेश्वर यांनी दिली.

Tags: