बेळगावमधील संत मेलगे शाळेच्या १९८८-८९ च्या बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. तब्बल ३७ वर्षांनंतर एकत्र आलेल्या या विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनी आपल्या शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त करत ग्रंथालयाची भेट दिली आहे.


या माजी विद्यार्थ्यांनी केवळ आर्थिक मदतच केली नाही, तर स्वतः श्रमदान करून शाळेच्या एका जुन्या खोलीची डागडुजी आणि रंगकाम पूर्ण केले. या नूतनीकरण केलेल्या खोलीत साकारलेल्या ग्रंथालयाचे उद्घाटन माजी शिक्षिका गीता विष्णू मठस्थ यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
माजी विद्यार्थ्यांनी मातृभाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी सदैव कार्यरत राहावे, असे मत धनंजय पाटील यांनी व्यक्त केले. तर मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी कोणताही न्यूनगंड बाळगू नये, अशी प्रतिक्रिया सुरेश पाटील यांनी दिली. शाळेला मिळालेली ही ग्रंथालय देणगी अत्यंत अविस्मरणीय असल्याचे मुख्याध्यापक सुरेश मादार यांनी म्हटले आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सातेरी पाटील, सुशांत पाटील, शिवानंद करविंकोप आणि चंदा बावकर यांच्यासह सर्व माजी विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.


Recent Comments