बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात मगरींचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. एका शेतकऱ्याला आपल्या शेतातील विहिरीत दोन महाकाय मगरी आढळून आल्या असून, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

बैलहोंगल तालुक्यातील होसूर गावात ही घटना घडली आहे. येथील शेतकरी नागप्पा सत्तीगेरी हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात कामासाठी गेले होते. यावेळी विहिरीमध्ये त्यांना दोन मगरी असल्याचे दिसून आले. ही माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच मगरींना पाहण्यासाठी नागरिकांनी विहिरीकडे मोठी गर्दी केली.
मगरींच्या वावरामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, मगरींना सुरक्षितपणे बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. मगरींना पकडून सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम वन विभागाचे पथक करत आहे.


Recent Comments