DEATH

​ज्येष्ठ भूलतज्ज्ञ डॉ. परप्पा बेल्लद यांचे निधन

Share

​बेळगावमधील वैद्यकीय क्षेत्रातील एक ज्येष्ठ नाव आणि नामांकित भूलतज्ज्ञ डॉ. परप्पा एम. बेलद यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. निधन समयी ते ९१ वर्षांचे होते.

मूळचे विजापूर येथील आणि सध्या सदाशिवनगर येथे वास्तव्यास असलेल्या डॉ. बेलद यांनी बेळगावमध्ये अनेक दशके रुग्णसेवा केली होती.

डॉ. बेलद यांनी सिव्हिल रुग्णालय, जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालय आणि केएलई रुग्णालयामध्ये भूलशास्त्र विभागाचे पहिले प्रमुख म्हणून कार्य केले होते. एक अनुभवी तज्ज्ञ म्हणून त्यांनी या संस्थांमध्ये प्रदीर्घ काळ सेवा बजावली होती. त्यांच्या​ पार्थिवावर १४ एप्रिल २०२६ रोजी दुपारी सदाशिव नगर येथील लिंगायत स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

Tags: