बेळगाव शहर आणि ग्रामीण भागात पोलिसांनी मटका आणि जुगारप्रकरणी केलेल्या कारवाईत पाच तरुणांना अटक केली आहे.


हिरेबागेवाडी पोलिसांनी केलेल्या मटका प्रकरणातील कारवाईत हुसेन बबनसाब विजापूर याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक बसवराज मटगार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही कारवाई केली असून संशयितांकडून रोख रक्कम आणि मटका साहित्य जप्त करत गुन्हा दाखल केला आहे.
दुसरीकडे, एपीएमसी आणि मार्केट पोलीस ठाण्यांच्या हद्दीत गांजा सेवन केल्याप्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अभिषेक दौलत पाटील आणि विलास शंकर बाळेकुंद्री या दोघांना अटक केली. तर मार्केट पोलिसांनी विजय संजय कवीलकर, उत्कर्ष सुनील वर्मा आणि हर्ष सुनील वर्मा यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी पोलीस आयुक्तांनी कारवाई करणाऱ्या पथकाचे कौतुक केले आहे.


Recent Comments