चिक्कोडी तालुक्यातील येडूरटेक, येडूरवाडी आणि सिद्धापूरवाडी या गावांमध्ये मंदिर समितीच्या वतीने विविध देवस्थानच्या इमारत बांधकामांना सुरुवात करण्यात आली आहे.


आमदार गणेश हुक्केरी आणि दिल्लीतील विशेष प्रतिनिधी प्रकाश हुक्केरी यांच्या निधीतून येडूरटेक, येडूरवाडी आणि सिद्धापूरवाडी येथील मंदिर बांधकाम कामांना औपचारिक प्रारंभ झाला. यडूरटेक येथील सप्त मातृका मंदिरासाठी ९.५० लाख, यडूरवाडीतील लक्ष्मीदेवी मंदिरासाठी १७ लाख आणि सिद्धापूरवाडीतील हनुमान मंदिरासाठी २० लाख असा एकूण ४६.५० लाखांचा निधी हुक्केरी बंधूंनी उपलब्ध करून दिला असून ग्रामस्थांनी याचे पूजन केले.

अनेक दिवसांपासून रखडलेल्या या विकासकामांना हुक्केरी बंधूंच्या सहकार्यामुळे गती मिळाल्याने मंदिर समिती आणि ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले आहेत. अशा धार्मिक स्थळांच्या संवर्धनामुळे ग्रामीण भागातील भाविकांची सोय होणार असून, उद्घाटन प्रसंगी विविध गावांचे लोकप्रतिनिधी, मंदिर समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी येथील दादा नरवाडे, पोपट किल्लेदार, महेश बेळवी, विजय तावदारे, अजित किल्लेदार, बाळू धनगर, विश्वनाथ माने, रणजित शिरशेट, अभिषेक कोरे व सुनील कोरे यांसह मंदिर समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments