बेळगाव तालुक्यातील काकती येथील यमनापूर गल्लीतील रहिवासी सुगंधा बसवण्णेप्पा बागेवाडी यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. निधनसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या.

सुगंधा बागेवाडी यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे. त्या बेळगाव जिल्हा वकील नोटरी संघाचे अध्यक्ष आणि बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष चन्नबसप्पा बागेवाडी यांच्या मातोश्री होत्या. तसेच कर्नाटक राज्य ग्राहक मंचाच्या न्यायाधीश सुनीता चन्नबसप्पा बागेवाडी यांच्या त्या सासू होत्या.
रविवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता त्यांच्या शिवगणाराधनेचा कार्यक्रम पार पडणार असल्याचे बागेवाडी कुटुंबाकडून कळवण्यात आले आहे.


Recent Comments