Hukkeri

​सिद्धरामय्या पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार; सतीश जारकीहोळी यांचे स्पष्टीकरण

Share

​राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले असतानाच, बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी येथे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी मोठे विधान केले आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या हेच आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे सांगत त्यांनी सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

​मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेवर भाष्य करताना सतीश जारकीहोळी यांनी हुक्केरीमध्ये आपली भूमिका स्पष्ट केली. भाजप नेते रमेश कत्ती यांच्या विधानाचा समाचार घेताना, “हायकमांडच्या निर्णयानुसार सिद्धरामय्या हे पूर्ण पाच वर्षांसाठी मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, यात कोणतीही शंका नाही,” असे सतीश जारकीहोळी यांनी म्हटले. नेतृत्वाबाबत पसरवल्या जाणाऱ्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

​सरकारचे पूर्ण लक्ष केवळ राज्याच्या विकासकामांवर केंद्रित आहे, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. विरोधी पक्षाचे नेते राजकीय हेतूने अशा चर्चा घडवून आणत आहेत, मात्र सरकार आपल्या लोककल्याणकारी योजनांद्वारे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करेल, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी दिली.

Tags: