बेळगावमधील बीम्स आवारातील शासकीय नर्सिंग शाळेच्या १०९ व्या बॅचचा दीप प्रज्वलन आणि शपथविधी सोहळा ‘प्रेरणा ज्योती-२०२६’ आज मोठ्या थाटात पार पडला. महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले.


बीम्सच्या नवीन सभागृहात आयोजित या कार्यक्रमात जीएनएम नर्सिंगच्या विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात करताना सेवावृत्तीची शपथ घेतली. यावेळी वैद्यकीय शिक्षण संचालिका डॉ. बी. एल. सुजाता राठोड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या, तर बीम्सचे संचालक डॉ. अशोक कुमार शेट्टी यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषवले.

या सोहळ्याला विशेष आमंत्रित म्हणून मडिवाळप्पा एन., डॉ. संजय पिरापूर आणि बंगळुरूहून आलेल्या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. परिचारिका क्षेत्रातील पवित्रता आणि जबाबदारी जपण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला बीम्सच्या रेष्मा ताळीकोटी, शिल्पा वाली, डॉ. सरोजा तिगडी, डॉ. उमेश कुलकर्णी, डॉ. जगदीश गाणगी आणि डॉ. ईरण्णा पल्लेद यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. प्रकाश कोडली यांनी सर्वांचे स्वागत केले. शेकडो विद्यार्थ्यांनी याप्रसंगी जनसेवेची शपथ घेत आपल्या वैद्यकीय प्रवासाला सुरुवात केली.



Recent Comments