बेळगाव शहरात अमली पदार्थांची विक्री आणि अवैध जुगाराविरोधात मार्केट आणि शहापूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. या मोहिमेत हेरॉईन आणि रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण चार जणांविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

खंजर गल्लीमध्ये हेरॉईन विक्री करणाऱ्या अर्बाज नागानूर याला मार्केट पोलिसांनी अटक करून त्याच्याकडून ४.१ ग्रॅम हेरॉईन आणि स्कूटर जप्त केली. तसेच शहापूर पोलिसांनी मलप्रभा नगर आणि येडियुरप्पा मार्गावरील मटका अड्ड्यांवर छापा टाकून संजय धनदवर आणि महेश गंदिगवाड यांना ताब्यात घेतले. अमली पदार्थ पुरवठादार तबीज सामरी आणि मटका एजंट अभय पाटील यांच्यासह सर्व आरोपींवर कठोर कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस आयुक्तांनी या कारवाईचे कौतुक केले आहे.


Recent Comments