पत्रकारांनी केवळ तर्क-वितर्कांवर आधारित बातम्या देऊ नयेत, कारण अशी पत्रकारिता समाजासाठी अत्यंत घातक आहे, असे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्पष्ट केले. बिदरमध्ये आयोजित ४० व्या राज्य पत्रकार संमेलनाचे उद्घाटन करताना ते बोलत होते.


मुख्यमंत्री म्हणाले की, पती-पत्नीमधील भांडणे दिवसभर दाखवण्यापेक्षा त्याच्या सामाजिक परिणामांचा विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांनी पत्रकारितेतून शोषितांना न्याय दिला. तोच वारसा आजच्या पत्रकारांनी चालवला पाहिजे. संविधानातील मूल्यांची जपणूक करून पत्रकारांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ बळकट करावा, असेही त्यांनी नमूद केले.

या सोहळ्याला पालकमंत्री ईश्वर खंड्रे, मंत्री रहीम खान, ज्येष्ठ संपादक विश्वेश्वर भट आणि पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष शिवानंद तगडूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गरिबांच्या सक्षमीकरणासाठी सरकार राबवत असलेल्या योजना पत्रकारांनी समाजापर्यंत पोहोचवाव्यात, अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.



Recent Comments