Kagawad

​उगार खुर्दमध्ये उद्या ‘जनशक्ती सेवा संघा’चा लोकार्पण सोहळा

Share

​बेळगाव जिल्ह्यातील कागवाड तालुक्यातील उगार खुर्दमध्ये जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी ‘जनशक्ती सेवा संघ’ सज्ज झाला आहे. उद्या रविवारी सायंकाळी या नव्या संघटनेचा उद्घाटन सोहळा पार पडणार असल्याची माहिती ॲड. राहुल कटगेरी यांनी दिली आहे.

​सुमारे २६ हजार लोकसंख्या असलेल्या उगार खुर्दमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि अस्वच्छता यांसारख्या जनतेच्या समस्या गंभीर बनल्या आहेत. कृष्णा नदीच्या तीरावर हे शहर असूनही नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे समोर आले आहे. या सर्व प्रश्नांवर संघटित होऊन जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी ॲड. राहुल कटगेरी यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक तरुणांनी या संघटनेची स्थापना केली आहे.

​या संघटनेचा उद्घाटन सोहळा १९ तारखेला सायंकाळी संपन्न होणार आहे. उगार शुगर फॅक्टरीचे व्यवस्थापकीय संचालक चंदन शिरगावकर यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कागवाडचे तहसीलदार रवींद्र हादिमनी, पीएसआय राघवेंद्र खोत यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

​जनशक्ती सेवा संघाचे नूतन अध्यक्ष राजू एसवाडे, उपाध्यक्ष भावना मलिक जमखाने आणि सचिव अरुण मुल्ला यांच्यासह तरुण कार्यकर्त्यांची टीम शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याची प्रतिक्रिया ॲड. राहुल कटगेरी यांनी व्यक्त केली आहे.

Tags: