बागलकोट पोटनिवडणुकीसाठी महिनाभर चाललेला झंझावाती प्रचार थंडावला असून उमेदवारांनी आता विश्रांतीला प्राधान्य दिले आहे. काँग्रेसचे उमेश मेटी आणि भाजपचे वीरण्णा चरंतीमठ यांनी प्रचाराच्या थकव्यानंतर आजचा पूर्ण दिवस आपल्या कुटुंबासोबत घालवला.


बागलकोट पोटनिवडणुकीचे मतदान पार पडताच मतदारसंघातील राजकीय हालचाली काहीशा मंदावल्या असून प्रमुख उमेदवार सध्या रिलॅक्स मोडमध्ये आहेत. गेल्या महिनाभरापासून मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात फिरून मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या नेत्यांनी आज घरातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यावर भर दिला. ४ मे रोजी लागणाऱ्या निकालापर्यंतचा हा काळ मानसिक तणाव कमी करण्यासाठी उमेदवार वापरत असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे उमेदवार आपल्या घरी विसावा घेत असले तरी, कार्यकर्त्यांमध्ये मात्र विजयाच्या गणितांची आणि मतांच्या फरकाची चर्चा ठिकठिकाणी रंगल्याचे चित्र बागलकोटमध्ये पाहायला मिळत आहे. सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून सर्वांचे लक्ष निकालाकडे लागले आहे.


Recent Comments