बेळगावमध्ये येत्या १२ ते १४ एप्रिल या कालावधीत सोमनाथ ज्योतिर्लिंगाचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. रविशंकर गुरुजी मठाचे महेश केरकर यांनी बेळगावमधील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

बेळगावमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना, शेकडो वर्षांची परंपरा असलेले हे पवित्र ज्योतिर्लिंग भाविकांच्या दर्शनासाठी तीन दिवस शहरात असेल, असे महेश केरकर यांनी सांगितले. शंकराचार्यांच्या उल्लेखानुसार हे ज्योतिर्लिंग रविशंकर गुरुजी यांच्याकडे सोपवण्यात आले असून, आता ते दर्शनासाठी उपलब्ध करून देण्यात आले असल्याची माहिती महेश केरकर यांनी दिली.
ज्या भाविकांना प्रत्यक्ष सोमनाथला जाऊन ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणे शक्य नाही, त्यांच्या सोयीसाठी हे ज्योतिर्लिंग राज्याच्या विविध भागात फिरत असल्याचे प्रवीण शेरी यांनी सांगितले.
यानुसार १२ एप्रिल रोजी सोमवार पेठ, १३ एप्रिल रोजी सकाळी कपिलेश्वर मंदिर आणि संध्याकाळी मिलिटरी महादेव मंदिर, तर १४ एप्रिल रोजी रामतीर्थ नगर येथे भाविकांना दर्शन घेता येईल, असे प्रवीण शेरी यांनी स्पष्ट केले.


Recent Comments