राज्य राजकारणात खळबळ माजवून देणाऱ्या धारवाड जिल्हा पंचायत सदस्य योगेश गौडा हत्या प्रकरणाचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडला आहे. लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज निकाल न देता तो आता १५ एप्रिलपर्यंत राखून ठेवला आहे.

बहुप्रतीक्षित योगेश गौडा हत्या प्रकरणाची सुनावणी घेणाऱ्या लोकप्रतिनिधींच्या विशेष न्यायालयाने आज महत्त्वपूर्ण निकाल देणे अपेक्षित होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदार विनय कुलकर्णी यांच्यासह एकूण २१ आरोपी न्यायालयीन कामकाजासाठी हजर झाले होते. “सत्याचा विजय होईल आणि न्यायालयावर आमचा पूर्ण विश्वास आहे,” अशी प्रतिक्रिया विनय कुलकर्णी यांनी न्यायालयात जाण्यापूर्वी व्यक्त केली. मात्र, न्यायाधीशांनी हा निकाल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलला असून, आता संपूर्ण राज्याचे लक्ष त्या दिवसाकडे लागले आहे.


Recent Comments