Belagavi

कंग्राळ गल्लीत रस्ते विकासाला प्रारंभ

Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भेट दिलेल्या बेळगावमधील कंग्राळ गल्लीतील रस्ते विकास कामांना नगरसेवक शंकर पाटील यांच्या हस्ते आज सुरुवात करण्यात आली.

बेळगावमधील कंग्राळ गल्लीमध्ये आज नगरसेवक शंकर पाटील यांनी रस्ते डांबरीकरण आणि सुधारणा कामांचे अधिकृत उद्घाटन केले. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्याने स्थानिक रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कंग्राळ गल्ली ही डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वास्तव्याने पावन झालेली जागा आहे. १४ एप्रिल रोजी साजऱ्या होणाऱ्या डॉ. आंबेडकर जयंतीपूर्वीच या भागातील विकासकामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या भागातील जनभावनेची दखल घेऊन तत्परतेने काम सुरू केल्याबद्दल दलित नेते मल्लेश चौगुले यांनी नगरसेवक आणि महानगरपालिका अधिकाऱ्यांचे आभार मानले.

Tags: