Vijayapura

सरकारी बसमध्ये हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रवाशाचा मृत्यू

Share

विजापूर जिल्ह्यातील सिंदगी शहरात सरकारी बसमधून प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. नातेवाईकांना भेटण्यासाठी जात असताना ही दुर्दैवी घटना घडली असून, यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

विजापूरहून सिंदगीला सरकारी बसने येत असताना एका प्रवाशाला चालत्या बसमध्येच हृदयविकाराचा तीव्र झटका आला. या घटनेत जिल्ह्यातील गोळसंगी येथील रहिवासी गौस हुसेनसाब लोकापूर (वय ४०) यांचा मृत्यू झाला आहे. नातेवाईकांच्या भेटीसाठी जात असतानाच त्यांच्यावर काळाने घाला घातला.

बसमध्ये अचानक प्रकृती बिघडल्यानंतर गौस हुसेनसाब यांना वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सिंदगी पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Tags: