चिक्कोडी : आमदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या प्रयत्नांमुळे मांजरी गावाचा कायापालट झाला असून, गावात सुमारे २० कोटी रुपयांची विकासकामे सुरू आहेत.


मांजरी गावात आमदार प्रकाश हुक्केरी आणि आमदार गणेश हुक्केरी यांच्या पुढाकाराने ५० लाख रुपये खर्चाच्या रस्ते विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी जुन्या बस स्थानकापासून काडसिद्धेश्वर मंदिरापर्यंतचा काँक्रीट रस्ता, शेडबाळे दुकान ते कोरे निवासस्थान आणि ग्रामपंचायत कार्यालय ते पुजारी गल्लीपर्यंतच्या रस्त्यांचे काम हाती घेण्यात आले आहे. तसेच मांजरी-सौंदत्ती पुलासाठी १० कोटी रुपये मंजूर झाले असून हे कामही लवकरच सुरू होणार असल्याचे पांडुरंग माने यांनी सांगितले.
यानंतर सिद्धार्थ गायगोळ यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “हुक्केरी पिता-पुत्रांच्या प्रयत्नांमुळे ही कामे मंजूर झाली असून, मी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. कंत्राटदाराने कामाचा दर्जा उत्तम राखण्याकडे लक्ष द्यावे,” अशी अपेक्षा सिद्धार्थ गायगोळ यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी सिद्धार्थ गायगोळ, अप्पा मुल्ला, शकील मुल्ला, पोपट लमखाने, अशोक घाटगे, प्रेमचंद शेट्टी, बाळू दयारकर, नितीन मायाण्णावार, पीडीओ व्ही. आर. पोतदार यांच्यासह गावातील प्रमुख नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


Recent Comments