बेळगावमधील गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी ध्वनी संतोष कुलकर्णी हिने पीयूसी द्वितीय वर्ष परीक्षेत ६०० पैकी ५९९ गुण मिळवून ऐतिहासिक यश संपादन केले आहे. वाणिज्य शाखेत राज्यात चमकलेल्या ध्वनीच्या या कामगिरीमुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे.

आज जाहीर झालेल्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या निकालात ध्वनी संतोष कुलकर्णी हिने वाणिज्य विभागात ५९९ गुण प्राप्त करून जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. बेळगावमधील नामांकित गोगटे पदवीपूर्व महाविद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या ध्वनीने मिळवलेल्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
परीक्षेत केवळ एक गुण कमी पडल्याने ध्वनीची ही कामगिरी राज्यस्तरावर चर्चेचा विषय ठरली आहे. या अभूतपूर्व यशानंतर तिचे कुटुंबीय आणि शिक्षकांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. शहरातील या प्रतिभेने आपल्या जिद्दीच्या जोरावर मिळवलेल्या यशाची सध्या सर्वत्र वाहवा होत आहे.


Recent Comments