Dharwad

धारवाडमध्ये अट्टल दुचाकी चोर जेरबंद

Share

धारवाड शहर पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेल्या दुचाकींची चोरी करणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पोलिसांनी या कारवाईत ७ दुचाकी जप्त केल्या असून आरोपीची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.

धारवाडमधील कमलापूर येथील रहिवासी असलेला शिवानंद माने असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. धारवाड शहर पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत दुचाकी चोरीची तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक गुरुनाथ चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तपास चक्रे फिरवून शिवानंदला बेड्या ठोकल्या.

पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशी केली असता, त्याने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून २ लाख ३५ हजार रुपये किमतीच्या एकूण ७ दुचाकी जप्त केल्या आहेत. चौकशी पूर्ण झाल्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता, त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे. याप्रकरणी धारवाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: