hubbali

हुबळी : ‘लव्ह जिहाद’ प्रकरणावरून हिंदू संघटना आक्रमक

Share

हुबळीमधील लव्ह जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर हिंदू कार्यकर्त्यांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची मागणी श्री राम सेनेने केली आहे. या मागणीचे निवेदन पोलीस आयुक्तांना देण्यात आले असून, कारवाई न थांबल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

हुबळीमधील जिम ट्रेनर समीर मुल्ला याच्या कुटुंबाने ६० हिंदू कार्यकर्त्यांविरोधात एफआयआर दाखल केला आहे. हे सर्व गुन्हे तातडीने रद्द करावेत, अशी मागणी श्री राम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी पोलीस आयुक्त एन. शशि कुमार यांच्याकडे केली आहे.

समीरच्या कुटुंबीयांनी हिंदू कार्यकर्त्यांवर केलेले सर्व आरोप खोटे असून पोलिसांनी हे गुन्हे मागे घ्यावेत. जर हे गुन्हे रद्द झाले नाहीत, तर पोलिसांनी मला मुख्य आरोपी करून प्रथम मला अटक करावी आणि त्यानंतरच कार्यकर्त्यांना हात लावावा, असे प्रमोद मुतालिक यांनी म्हटले.

Tags: