राज्यात द्विभाषा पद्धती लागू करण्याच्या चर्चेदरम्यान हिंदीला तिसरी भाषा म्हणून समाविष्ट करण्याच्या राज्यपालांच्या विधानाचा धारवाडमध्ये निषेध करण्यात आला.

कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाने याविरोधात रस्त्यावर उतरून तीव्र संताप व्यक्त केला.
धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने केली. दक्षिण भारत हिंदी प्रचार सभेपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढून कार्यकर्त्यांनी राज्यपालांच्या धोरणांचा विरोध केला.
राज्यपालांकडून राज्यावर हिंदी भाषा लादण्याचा प्रयत्न केला जात असून ते कन्नड विरोधी असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. आम्हाला असे राज्यपाल नकोत, त्यांची तत्काळ बदली करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. केंद्र सरकारने यावर निर्णय न घेतल्यास आगामी काळात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कर्नाटक रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.


Recent Comments