बेळगावमधील जिल्हा नगरविकास कक्षाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता (एईई) अजयसिंह राजपूत यांच्या निवासस्थानांवर मंगळवारी लोकयुक्तांनी छापे टाकले. बेहिशोबी मालमत्ता बाळगल्याच्या संशयावरून ही कारवाई करण्यात आली असून प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.


शहरातील आंजनेय नगर येथील निवासस्थान, तसेच अथणी आणि हुक्केरीमधील मालमत्तांवर लोकयुक्तांनी एकाच वेळी झडती सुरू केली. या प्राथमिक तपासणीत १ किलोहून अधिक सोन्याचे दागिने आणि बँक खात्यांमध्ये सुमारे २ कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे समोर आले आहे.

तपासणी दरम्यान बेळगाव शहरात अजयसिंह राजपूत यांची एकाशेजारी एक अशी तीन घरे असल्याचे निदर्शनास आले आहे. ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याच्या तक्रारीवरून लोकयुक्त अधिकाऱ्यांनी ही मोहीम हाती घेतली असून सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
सदर कारवाई डीवायएसपी बी. एस. पाटील आणि भरत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. सध्या जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि मालमत्तेची सूक्ष्म चौकशी सुरू असल्याचे बी. एस. पाटील यांनी म्हटले.


Recent Comments