बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यातील तिगडी गावातील हरीनाळ जलाशयाला सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.

सिंचन विभागाचे अधिकारी लक्ष्मण नायक यांनी यावेळी माध्यमांशी संवाद साधला. जलाशयाची स्थिती सध्या उत्तम असून, त्यातील गाळ काढण्याबाबतचा सविस्तर प्रस्ताव तयार केला जात असल्याची माहिती लक्ष्मण नायक यांनी दिली.
जलाशयाच्या परिसरात कोणत्याही प्रकारचे अनैतिक प्रकार किंवा बेकायदेशीर हालचाली आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा लक्ष्मण नायक यांनी दिला आहे. प्रशासनाकडून या प्रकल्पाच्या देखभालीकडे विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


Recent Comments