Accident

​धारवाडमध्ये रस्ते अपघातात केएसआरपी जवानाचा मृत्यू

Share

​धारवाडमध्ये कर्तव्यावर जात असलेल्या केएसआरपी जवानाच्या दुचाकीला गॅस टँकरने धडक दिली. या भीषण अपघातात जवानाचा जागीच मृत्यू झाला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
​धारवाडमधील नवनगर पोलीस आयुक्त कार्यालयाजवळ कर्तव्यावर असलेल्या केएसआरपी जवानाच्या अंगावरून गॅस टँकर गेल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना हुबळी-धारवाड रस्त्यावरील रायपूर येथे घडली आहे.
​मृत व्यक्तीची ओळख पटली असून एन. एफ. सिद्धप्पनवर असे या ५२ वर्षीय जवानाचे नाव आहे. ते केएसआरपी विभागात कार्यरत होते. दुपारी जेवण करून पुन्हा कर्तव्यावर परतत असताना गॅस टँकरने सिद्धप्पनवर यांच्या स्कुटरला धडक दिली. या अपघातात डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने एन. एफ. सिद्धप्पनवर यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर नवनगर एपीएमसी पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला आहे.

Tags: