जोल्ले समूहाची उपकंपनी असलेल्या यक्संबा येथील ज्योती बहुउद्देशीय सौहार्द सहकारी संस्थेने २०२५-२६ या आर्थिक वर्षात २.१ कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला असल्याची माहिती जोल्ले समूहाचे उपाध्यक्ष आणि संस्थेचे संचालक बसवप्रसाद जोल्ले यांनी दिली.

संस्थेच्या प्रगतीचा आलेख मांडताना बसवप्रसाद जोल्ले यांनी सांगितले की, ज्योती सोसायटीचे आज ५२ हजार ४२६ सभासद असून २.७९ कोटी रुपयांचे भागभांडवल आहे. संस्थेकडे १३.२१ कोटींचा राखीव निधी असून ४२४.६७ कोटी रुपयांच्या ठेवी जमा आहेत, ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे.
संस्थेने आतापर्यंत २५४.२५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून १३६.९६ कोटींची गुंतवणूक बँकांमध्ये आहे. संस्थेचे खेळते भांडवल ४४०.६८ कोटी असून एकूण उलाढाल ७२६.४४ कोटींवर पोहोचली आहे. राज्याच्या विविध जिल्ह्यांत ८२ शाखा कार्यरत असून यंदा हारूगेरी, अथणी, जागनूर, चुंचनूर, एलिमुन्नोळी आणि खनदाळ या ६ नवीन शाखा सुरू करणार असल्याचे बसवप्रसाद जोल्ले यांनी स्पष्ट केले.
या पत्रकार परिषदेला जोल्ले समूहाचे ज्योतिप्रसाद जोल्ले, संस्थेचे अध्यक्ष बाबूराव माळी, उपाध्यक्ष विश्वनाथ पेटकर, संचालक जगदीश हिंग्लजे, जगदीश जाधव, रावसाहेब बाकळे, कल्लाप्पा नाईक, बाळासाहेब शिंदे, सविता उंदुरे, कृष्णप्पा पुजारी, आनंद गिड्ड, लक्ष्मण प्रभात, अमृत खोत, मुख्य व्यवस्थापक संतोष पाटील, सहाय्यक मुख्य व्यवस्थापक महांतेश शिरोळ, तानाजी शिंदे आणि संतोष पुजारी उपस्थित होते.


Recent Comments