बेळगावमधील मार्केट पोलीस ठाण्याचे सीपीआय संतोष सत्यनायक यांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल राज्य सरकारचा मानाचा ‘मुख्यमंत्री सुवर्ण पदक’ पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशाबद्दल कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने बेळगावमध्ये त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

सत्यनायक यांच्या निष्कलंक आणि धाडसी सेवेची दखल घेऊन सरकारने त्यांना या सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. सत्कार समारंभात बोलताना दीपक गुडगनट्टी, गणेश रोकडे आणि सिद्धप्पा कांबळे यांनी सत्यनायक यांच्या कार्यशैलीचे कौतुक केले. त्यांचा हा प्रवास पोलीस दलासाठी आणि समाजासाठी आदर्श असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.
सत्कार स्वीकारल्यानंतर संतोष सत्यनायक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या पुरस्कारामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून, याचे श्रेय माझ्या संपूर्ण टीमला जात असल्याचे संतोष सत्यनायक यांनी म्हटले. समाजातील शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


Recent Comments