Bagalkot

बागलकोटमध्ये पोटनिवडणुकीचा धुराळा; मतदारांना साद घालण्यासाठी मुख्यमंत्री मैदानात

Share

बागलकोट पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापले असून मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतः कंबर कसली आहे. ज्येष्ठ आमदारांना विश्वासात घेऊन निवडणुकीतील विजयाचा मार्ग सुकर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी खास रणनीती आखली आहे.

बागलकोट पोटनिवडणुकीच्या निमित्ताने मुख्यमंत्री सिद्धरामय्या सध्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, त्यांनी आज ज्येष्ठ आमदार बी. बी. चिम्मनकट्टी यांच्या निवासस्थानी भेट देऊन महत्त्वाची चर्चा केली.

यावेळी मंत्री विनय कुलकर्णी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत उपस्थित राहून मतदारसंघातील पक्ष संघटना आणि मतदारांना आपल्याकडे वळवण्याबाबत सविस्तर चर्चा केली. ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव आणि मंत्र्यांचा सक्रिय सहभाग यांच्या जोरावर पोटनिवडणुकीत काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी सिद्धरामय्या यांनी येथूनच प्रचाराचा नारळ फोडला आहे. या भेटीमुळे जिल्हा राजकारणात मोठी खळबळ उडाली असून विरोधी पक्षांच्या रणनीतीला लगाम घालण्यासाठी काँग्रेस नेते सज्ज झाले आहेत.

Tags: