हुक्केरी शहरामधील नवीन बस स्थानकाजवळ एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृतदेह आज आढळून आला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

हुक्केरी मधील बस स्थानक परिसरात सापडलेला हा मृतदेह बडकुंद्री गावामधील शंकर बडिगेर या व्यक्तीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. शंकर हा पेशाने शिंपी काम करत होता, मात्र गेल्या काही दिवसांपासून तो मद्याच्या आहारी गेला होता. याच नशेत तो हुक्केरी बस स्थानक परिसरात वास्तव्य करत होता, अशी माहिती समोर आली आहे.
काल रात्री देखील अतिमद्यप्राशन केल्यामुळे शंकर याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त केला जात आहे. घटनेची माहिती मिळताच हुक्केरी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवून दिला.
या प्रकरणी हुक्केरी पोलिसांनी नातेवाईकांच्या तक्रारीवरून नोंद केली असून, मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू केला आहे. अशी प्रतिक्रिया हुक्केरी पोलिसांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments