Belagavi

बेळगावमध्ये श्री राम सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक

Share

उत्तर कर्नाटक प्रांतातील श्री राम सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बेळगावमध्ये पार पडली.

या बैठकीत धर्मरक्षण, गोरक्षा आणि लव्ह जिहादसारख्या विषयांवर गंभीर चर्चा करण्यात आली असून, या समस्यांना आळा घालण्यासाठी संघटनेने आक्रमक भूमिका घेण्याचा निर्धार केला आहे.

कर्नाटकचे उत्तर प्रांत अध्यक्ष रविकुमार कोकीतकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला. बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा मिळावा या प्रमुख मागणीसाठी येत्या २७ एप्रिल रोजी राज्यातील प्रत्येक तालुक्यात सरकारला निवेदन देण्याचे ठरविण्यात आले आहे यासंदर्भात रविकुमार कोकीतकर यांनी बैठकीचा उद्देश स्पष्ट केला.

या बैठकीत कर्नाटकातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते

Tags: