Belagavi

पिरनवाडीमध्ये जलजीवन मिशन योजनेचे लोकार्पण

Share

बेळगावमधील पिरनवाडी ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या पिण्याच्या पाण्याची प्रतीक्षा अखेर संपली आहे. आमदार अभय पाटील यांच्या विशेष पाठपुराव्यातून साकारलेल्या जलजीवन मिशन योजनेचे आज अधिकृतपणे लोकार्पण करण्यात आले.

बेळगावमधील पिरनवाडीमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून निर्माण झालेली पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या सोडवण्यासाठी दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. २०२२ मध्ये जलजीवन मिशन योजनेअंतर्गत प्रत्येक घरात नळ जोडून पाणी पुरवठा करण्याच्या कामाला गती देण्यात आली होती. सुमारे २४०० घरांना आणि शेकडो नागरिकांना अखंडित पिण्याचे पाणी देणारी ही महत्त्वपूर्ण योजना आहे. हे काम आता पूर्णत्वास आले असून अभय पाटील यांच्या हस्ते या नव्या योजनेचे लोकार्पण पार पडले.

या योजनेमुळे पिरनवाडीमधील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण दूर झाली असून, गावकऱ्यांनी आमदार अभय पाटील यांचा सत्कार करून आपली कृतज्ञता व्यक्त केली. अशा भावना पिरनवाडीमधील ग्रामस्थांनी यावेळी व्यक्त केल्या.

Tags: