बेळगाव शहराची तहान भागवणाऱ्या राकसकोप जलाशयातील पाणीपातळीत एप्रिलच्या सुरुवातीलाच मोठी घट झाली आहे. जलाशयातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असून, आगामी काळात शहराच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बेळगावची जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या राकसकोप जलाशयाने एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच तळ गाठायला सुरुवात केली आहे. वाढत्या उष्णतेमुळे जलाशयातील पाण्याची आवक पूर्णपणे थांबली असून, सध्या उपलब्ध असलेला अत्यल्प साठा प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे करत आहे. जलाशय आटत असल्यामुळे महानगरपालिका आणि जलपुरवठा मंडळाला आतापासूनच पाण्याचे नियोजन करणे कठीण जात आहे.
शहराला पाणीपुरवठा करणारा हा मुख्य स्रोत कोरडा पडत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, जर यंदा मान्सून लांबणीवर पडला, तर बेळगाव शहराला तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.


Recent Comments