चिक्कोडी तालुक्यातील यक्संबा येथील जोल्ले ग्रुपची उपसंस्था असलेल्या श्री बीरेश्वर को-ऑप क्रेडिट सोसायटीच्या चालू आर्थिक वर्षातील उलाढालीची माहिती जोल्ले ग्रुपचे संस्थापक आणि बेळगाव डीसीसी बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब जोल्ले यांनी दिली.
निपाणीमधील हालसिद्धनाथ साखर कारखान्यात आयोजित पत्रकार परिषदेत अण्णासाहेब जोल्ले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कर्नाटक, महाराष्ट्र आणि गोवा या तीन राज्यांत २३३ शाखा असलेल्या या संस्थेचे ४.४५ लाख सभासद असून ५१८३ कोटींच्या ठेवी आणि ५८३९ कोटींचे खेळते भांडवल आहे. ग्राहकांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणामुळेच हे यश मिळाल्याचे सांगत, जोल्ले ग्रुप आता हरित ऊर्जा, आरोग्य सेवा आणि पंचतारांकित हॉटेल क्षेत्रातही विस्तार करत असल्याचे अण्णासाहेब जोल्ले यांनी नमूद केले.
या पत्रकार परिषदेला संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब जोल्ले, उपाध्यक्ष आनंद पाटील यांच्यासह संचालक सिदराम गडदे, यासीन तांबोळी, श्रीनिवास कराळे आणि इतर व्यवस्थापकीय अधिकारी उपस्थित होते. संस्थेच्या या आर्थिक प्रगतीबद्दल सर्वच स्तरांतून समाधान व्यक्त होत आहे.


Recent Comments