Belagavi

ठेवीदारांची फसवणूक करणाऱ्या पतसंस्थेच्या ध्यक्षाला एक वर्षाचा कारावास

Share

बेळगावमधील रिद्धी सिद्धी मल्टीपर्पज को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षांनी ग्राहकांच्या ठेवी परत न केल्याने जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने त्यांना एक वर्ष कारावास आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

बेळगावमध्ये शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वकील एन. आर. लातूर यांनी या निकालाची माहिती दिली. सोसायटीमध्ये ठेवलेल्या ठेवींची मुदत संपल्यानंतरही पैसे परत मिळत नसल्याने स्नेहा नाद आणि त्यांची मुलगी परिमळा यांनी २०२३ मध्ये ग्राहक आयोगाकडे दाद मागितली होती. या तक्रारीची दखल घेत आयोगाने ४ लाख रुपयांची ठेव व्याजासह परत करण्याचे आदेश सोसायटीला दिले होते, अशी माहिती एन. आर. लातूर यांनी दिली.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्यामुळे २०२६ मध्ये आयोगाने श्याम जाधव यांना २५ हजार रुपये दंडासह एक वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेविरोधात जाधव यांनी राज्य आयोगाकडे दाद मागितली होती. मात्र, राज्य आयोगाने ४ फेब्रुवारी रोजी त्यांचा अर्ज फेटाळून लावत जिल्हा आयोगाचा निकाल कायम ठेवला होता, असे एन. आर. लातूर यांनी स्पष्ट केले.

राज्य आयोगाच्या निर्णयानंतर जिल्हा ग्राहक आयोगाने २५ मार्च रोजी श्याम जाधव यांच्याविरोधात जेल वॉरंट जारी केले होते. या प्रक्रियेनुसार आता सोसायटी अध्यक्षांची कारागृहात रवानगी झाली असल्याची माहिती वकील एन. आर. लातूर यांनी दिली.

Tags: