बेळगावमधील पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिरात हनुमान जयंतीचा उत्सव अत्यंत श्रद्धापूर्वक आणि उत्साहात साजरा करण्यात आला.

जन्मोत्सवानिमित्त पहाटेपासूनच मंदिरात धार्मिक विधींना सुरुवात झाली. श्री हनुमान मूर्तीला विशेष अभिषेक घालून आकर्षक अलंकार पूजेची आरास करण्यात आली होती. त्यानंतर विधीवत पूजा आणि महाआरती संपन्न झाली.
परिसरातील महिलांच्या उपस्थितीत पहाटे जन्मोत्सव पार पडल्यानंतर पाळणा सोहळा पार पाडण्यात आला. दिवसभर चाललेल्या या उत्सवात शेकडो भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला.


Recent Comments